व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी वाचनच गरजेचे : डॉ. एस. व्ही. पोरे
व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी वाचनच गरजेचे : डॉ. एस. व्ही. पोरे
सांगली: आज स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी व समाजात आपले स्थान निर्माण होण्यासाठी आपण आपल्या क्षमता व मर्यादा ओळखून स्वत:ला एक आदर्श व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी वाचनानेच आत्मबळ व एक प्रकारची प्रेरणा मिळते असे मत डॉ. एस. व्ही. पोरे यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचन प्रेरणा वृद्धिंगत होण्यासाठी “बुक रीव्ह” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही पोरे म्हणाले, एकाच क्षेत्रातील वाचन करण्यापेक्षा सर्व क्षेत्रातील वाचन करावे, अनेक मोठ्या व्यक्तींची चरित्रे वाचा, लोककथा वाचा, लोकसाहित्य वाचा. माणूस भौतिक सुखाच्या पाठीमागे धावत असताना वाचनापासून दूर होत आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. वाचनामुळेच आपली संस्कृती समजते. वाचनाने ज्ञानवृद्धी होते. जगण्याची नवी दृष्टी मिळते. एक नवी उमेद निर्माण होते. सामर्थ्य कळते. तसेच तणावातून मुक्ती मिळण्यासाठी वाचन गरजेचे असते. वाचनातूनच जगणे सुखकारक होते व त्यामुळे वाचाल तरच वाचाल.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर यांनी केले. आभार डॉ. ए. एम. सरगर यांनी केले.
(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment