Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पदव्युत्तर वाणिज्य विभागाचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पदव्युत्तर वाणिज्य विभागाचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न


सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॅा. पतंगराव कदम महाविद्यालयातील  वाणिज्य विभागातील एम. कॉम. भाग-२ मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एम.कॉम.भाग १ च्या विद्यार्थ्यांकरिता स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ.एस.व्ही. पोरे होते. 
       
यावेळी  विद्यार्थ्यांनी भारती विद्यापीठ गीत सादर केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकरिता विविध फनी गेम्स व  शेलापागोटे याचे आयोजन केले होते.
     
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ.पोरे म्हणाले की, सध्याच्या बदलत्या शैक्षणिक परिस्थिती मध्ये  विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षणाबरोबरच समाजोपयोगी संशोधन केले पाहिजे. तसेच पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली वर्तणूक आदर्शवत अशी ठेवली पाहिजे की, इतर सर्व विद्यार्थी त्यांच्या पावलावर पाऊल टाकतील. तसेच भारती विद्यापीठातल्या विविध विद्याशाखा, सुसज्ज इमारती, तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच इथे उपलब्ध असणाऱ्या सोयी, सुविधा व सवलती विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच व्यवसाय व नोकरी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक गुण कौशल्यांचा स्वतःमध्ये विकास केला पाहिजे, त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी  समाजोपयोगी उपक्रमातही सहभागी होऊन समाजामध्ये बदल घडवून आणला पाहिजे.  यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भारती विद्यापीठ गीताचे त्यांनी कौतुक केले.
        
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. संजय ठिगळे यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. 
     
वाणिज्य विभागप्रमुख डॉ.अनिकेत जाधव यांनी वाणिज्य विभागाच्या इतिहासाचा उलगडा करून विभागाची सुरुवात,  संस्थेचे विशेष योगदान, विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या शिष्यवृत्त्या, संशोधन, अभ्यासपूरक कार्यक्रम व विविध स्पर्धांमधील यश इत्यादी गोष्टींची माहिती दिली. 
       
यावेळी तसेच , श्री. आर. आर. गोडबोले, कु. ए. एस. पाटील, कु. पी. एम. रासनकर, कु. पी.व्ही. धुळे इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. अनिकेत जाधव यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार कु. वैष्णवी पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शाहीन मुजावर यांनी केले. या कार्यक्रमास  सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)