yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती साठी निवड - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती साठी निवड

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची 'मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती' साठी निवड


सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील विद्यार्थ्यांना वेकफील्ड फाउंडेशन पुणे यांचेकडून 'मल्होत्रा वेकफील्ड फाउंडेशन शिष्यवृत्ती' प्राप्त झाली. फाउंडेशन कडून शास्त्र शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी पदवी, पदव्युत्तर व पी. एच. डी. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. पद्मश्री डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी संचालक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ, भारत सरकार हे या फाउंडेशनचे सल्लागार आहेत.

यावर्षी महाविद्यालयातील एकूण १५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली. त्यामध्ये बी. एस्सी. भाग-१ मधुन कु. आश्विनी बावदाने, कु. श्रुती काकणे, बी. एस्सी. भाग-२ मधुन कु. सुप्रिया अंबी, कु. प्रेरणा पाटील, कु. रिद्धी पाटील, कु. सानिया मुल्ला, कु. साक्षी मगदूम, कु. प्रज्ञा जाधव, कुमार सुजोश घोडके, कुमार सुरेंद्र सावंत, तसेच बी. एस्सी. भाग-३ मधुन कु. श्रावणी मलपे, कु. वैष्णवी पुराणिक, कु. अनुराधा जाधव, कु. आकांशा चव्हाण आणि एम. एस्सी. भाग २ मधील कु. शुभांगी पाटील यांचा समावेश आहे. 
        
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे अभिनंदन केले . त्यांना प्रोत्साहन देताना म्हणाले की, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण अभ्यास करत उत्तम गुण मिळवले, असे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करण्यासाठी अशा स्वरूपाच्या स्कॉलरशिप दिल्या जातात. विद्यार्थ्यांनी या मिळालेल्या संधीचे सोने करून आपली शैक्षणिक प्रगती करावी, असे प्रतिपादन केले.
           
याचे स्वरूप पदवी अभ्यासक्रमास १२००० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २०००० रूपये शिष्यवृत्ती मिळते. सलग चौथ्या वर्षी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळालेली आहे. रसायनशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. टी. आर. लोहार यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. 
     
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.ए. एल.जाधव, डॉ. एन. व्ही गायकवाड, डॉ. एन. डी. पवार यांच्यासहित सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)