Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत


सांगली- येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील संख्याशास्त्र व संगणकशास्त्र  विभागाच्या विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठाच्या बी. एस्सी. परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या  स्टॅटिस्टिक्स व कॉम्प्युटर सायन्स परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवत महाविद्यालयाची परंपरा जपली आहे. बी. एस्सी. भाग तीनमधील स्टॅटिस्टिक्स ची विद्यार्थिनी कु.सानिका आनंद पवार  हिने आठवा तर कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी कु. ऋतिका रविंद्र पाटील हिने दहावा क्रमांक मिळविला
           
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, महाविद्यालय विकास समिती व भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणेचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, सांगली विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी शाबासकी देऊन त्यांचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे, प्रा. सी. ए. शेटे, प्रा. अमोल वंडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)