Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा


सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे  पूजन करून अभिवादन करण्यात आले.
           
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे आपल्या संदेशात म्हणाले की, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञानाचे शिक्षक होते. त्यामुळे आजच्या शिक्षण प्रणालीत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा तंत्रज्ञानाला तत्त्वज्ञानाची जोड  मिळते तेव्हा समाजाचा शाश्वत विकास होत असतो.शिक्षक हा समाजातील पिढ्या घडविणारा महत्त्वाचा घटक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम हेसुद्धा आजन्म शिक्षकच होते. त्यांनी अनेक उत्तम आणि शिक्षकाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शिवाय शिक्षकांच्या कौटुंबिक दुःखात सहभाग, आर्थिक मदत असे अनेक उपक्रम डॉ. पतंगराव कदम साहेबांनी राबवले. याची जाणीव सर्व शिक्षकांनी ठेवणे गरजेचे आहे. शिक्षकांनी वेळेचे बंधन पाळून जबाबदारीने व प्रामाणिकपणे काम करायला हवे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
      
यावेळी  महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.  याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)