डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मंगळागौर कार्यक्रम उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मंगळागौर कार्यक्रम उत्साहात साजरा
सांगली: येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व महिला विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “पारंपारिक गौरी गाणी आणि खेळ”
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही पोरे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.पोरे म्हणाले, की मंगळागौरीच्या खेळामागे असलेला शास्त्रीय दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. तसेच शरीराला होणारा फायदा व संस्कृती याची माहिती होते. तसेच पूर्वजांनी ठरविलेले मंगळागौरीचा खेळ खेळल्यामुळे शरीराचा व्यायाम होऊन मानसिक दृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. धावपळीच्या या युगात महिला घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे वेळेअभावी महिलांना व्यायाम करण्यास वेळ नसतो. त्यामुळे मंगळागौर हा खेळ महिलांसाठी एक पर्वणीच आहे.
यावेळी महिला विकास समितीच्या समन्वयक प्रा.कु.भारती भावीकट्टी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत असून ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा केली जाते. त्यानंतर रात्री जागरण करतात.व जागरणाच्यावेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. या खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही गायली जातात.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, डॉ. नितीन गायकवाड, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. कु.भारती भाविकट्टी यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ.वर्षा कुंभार यांनी केले. आभार प्रा.मंगेश गावित यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment