डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सरपटणारे प्राणी जागरूकता दिवस साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सरपटणारे प्राणी जागरूकता दिवस साजरा
सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने
राष्ट्रीय सरपटणारे प्राणी जागरूकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय ठिगळे, कार्यक्रमाचे समन्वयक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा कुंभार तसेच भूगोल विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रूपाली कांबळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना सातपुते इ. उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र.प्राचार्य डॉ. पोरे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यात सरपटणाऱ्या प्राण्यांची महत्त्वाची भूमिका आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांना अनेकदा विविध धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यात अधिवास नष्ट होणे आणि वन्यजीवांचा अवैध व्यापार यांचा समावेश होतो, ज्यामुळे त्यांचे मूल्य आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज याबद्दल जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे ठरते. तसेच या प्राण्यांच्या विषयी अनेक अंधश्रद्धा आहेत त्यामुळे देखील त्यांची संख्या कमी होण्याचे प्रमाण जास्त आहे. या प्राण्यांच्या संवर्धनामध्ये विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका आहे त्यांनी समाजात याविषयी जनजागृती केली पाहिजे.
या कार्यक्रमाप्रसंगी बी.एस्सी. भाग दोन वर्गाच्या मुलांनी विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी तसेच मानव आणि मगर यांच्यातील संघर्ष, सापाविषयी अंधश्रद्धा, विषारी आणि बिनविषारी साप यांच्याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे स्वागत बी.एस्सी भाग- ३ ची विद्यार्थिनी कु. सादिया जमादार व प्रास्ताविक डॉ.वर्षा कुंभार यांनी केले. आभार प्रा. नलेश बहिरम यांनी मानले. या कार्यक्रमास प्राणीशास्त्र विभागातील प्रा. रूपाली माने, प्रा. प्रियंका जाधव यांच्यासह वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment