डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
सांगली: येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 'भारतीय संविधान दिन' साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या वेळी भारतीय संविधान अमृत वर्ष महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पोरे आपल्या मार्गदर्शनपर संदेशात म्हणाले की, भारतीय संविधानाने आपल्याला लिहिण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आणि जात, धर्म, वंश, पंथ विसरून सर्व भारतीयांना 'आम्ही भारताचे लोक' ही नवी ओळख दिली. अखंड भारत देशाला जोडण्याचं काम भारतीय राज्यघटनेने केले आहे.
या राज्यघटनेचा प्रत्येक भारतीयांनी आदर राखला पाहिजेच त्याचबरोबर संविधानाप्रती सदैव जागरूक असले पाहिजे.'आपल्या देशाची राज्यघटना ही भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. जगातील सर्वश्रेष्ठ घटनांमध्ये आपल्या देशाच्या राज्यघटनेचा समावेश होतो. यावेळी प्रा. एस. बी. पाटील यांनी भारतीय संविधान बद्दल मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना व मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे यांनी केले. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना सातपुते यांनी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाचे आभार डॉ.महेश कोल्हाळ यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा . ए.एल.जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक कनिष्ठ प्रा.एस.डी. पाकले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment