डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांच्या स्मृतीस अभिवादन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांच्या स्मृतीस अभिवादन
सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस .व्ही.पोरे यांनी अभिजित कदम यांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की, 'शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात भारती विद्यापीठाचा नावलौकिक व्हावा असे अभिजित दादांचे स्वप्न होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातही पुढे आले पाहिजे असा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. आज भारती विद्यापीठाच्या अनेक विद्याशाखा खेडोपाड्यात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आघाडीवर आहेत. हे त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होताना दिसत आहे.
या कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए .एल.जाधव सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment