Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन

सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय मध्ये व्यवसाय शिक्षण विभाग तर्फे "उद्योजकता विकास" या विषयावर होणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे उपस्थित असणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एम.डी. जोशी (जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी सांगली) उपस्थित असतील. या कार्यक्रमास  डॉ.अभिजीत शेटे (संचालक- आर.अँड. डी.अँड. बिझनेस डेव्हलपमेंट, शारदा इलेक्ट्रॉनिक्स सांगली) मार्गदर्शन करणार आहेत. व श्री मारुती माळी (संस्थापक- अध्यक्ष ब्रह्मा उद्योग समूह, सांगली) या सर्व तज्ञ मंडळींचे 'उद्योजकता विकास' या विषयावर असणाऱ्या कार्यशाळेमध्ये बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभणार आहे.
        
शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यशाळेस आजी व माजी तसेच यशस्वी उद्योजक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे  यांनी केले आहे

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)