Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ''उद्योजकता विकास" कार्यशाळा उत्साहात संपन्न


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये व्यवसाय शिक्षण विभागतर्फे "उद्योजकता विकास" कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे, उपप्राचार्य डॉ . अमित सुपले, डॉ.अभिजीत शेटे (संचालक- आर.अँड. डी.अँड. बिझनेस डेव्हलपमेंट, शारदा इलेक्ट्रॉनिक्स सांगली) व श्री मारुती माळी (संस्थापक- अध्यक्ष ब्रह्मा उद्योग समूह, सांगली), कार्यशाळेचे समन्वयक, एम.एल.टी.चे विभाग प्रमुख डॉ. ए. एस. सपकाळ, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए.एल.जाधव, इ.मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलगुरू डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अभिजित शेटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, उद्योजक बनण्यासाठी  प्रेरणा मिळाली पाहिजे. आजच्या तरुणाने नोकरी करण्यापेक्षा उद्योग करणे गरजेचे आहे. छंदाचे रूपांतर उद्योगात करा तर यशस्वी व्हाल. यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे तसेच वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करून यशस्वी उद्योजक बनले पाहिजे.
     
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. मारुती माळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, उद्योजकताशिवाय आजच्या तरुणाला पर्याय नाही.  स्वतःच्या जीवनाबद्दल तरुणांनी गंभीर असायला हवे. सतत प्रयत्न व कामाबद्दल कृतज्ञता हे दोन गुण आजच्या तरुणामध्ये असायला पाहिजे, परिस्थितीपेक्षा मोठे स्वप्न बघीतली पाहिजेत. कोणत्याही कामाला लाजू नका, कामाला प्रतिष्ठा द्या व त्यातूनच चांगले उद्योजक बना. शिक्षणाबरोबर उद्योगधंदा केल्याने जीवन चांगले बनेल. तुम्ही गरीब म्हणून  जन्माला आला आहे ना तुम्हाला श्रीमंत होण्याची चांगली संधी आली आहे असे समजा,असे प्रतिपादन केले. 
       
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे म्हणाले की,भारती विद्यापीठाचे संस्थापक,कुलगुरू डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षणाबरोबर समाजाचा विकास व्हावा या हेतूने व्यवसाय शिक्षण विभागाची सुरूवात महाविद्यालयामध्ये केली. या व्यवसाय शिक्षणातून अनेक माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजक घडले आहेत. त्यामुळे आजच्या तरुणांनी स्वतःचा कोणताही छोटा मोठा उद्योग करून स्वतःचा विकास करावा. मेहनतीला कमी लेखू नये, मेहनत केल्यानेच यशस्वी उद्योजक बनता येईल, असे मत मांडले. यावेळी प्रा.व्ही.एन.डुबल व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केले.     
        

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. ए. एस. सपकाळ यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रा.वासंती गावडे यांनी करून दिला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. आर. एस. काटकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.पी.ए.केंगार यांनी केले. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)