Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमाचे आयोजन

 

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमाचे आयोजन


सांगली:  येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमाचे २७ डिसेंबर ते १६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .     


या ग्रंथ प्रदर्शनामधून वाचन चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला मुक्त वाचन करता यावे तसेच सामूहिक वाचन, स्थानिक लेखन, पुस्तकांचे सामूहिक वाचन, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा आणि नवीन पुस्तक साहित्याची ओळख व्हावी या हेतूने प्रेरित असणाऱ्या 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


लेखक विद्यार्थ्यांशी संवाद या उपक्रमामध्ये अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.एस.डी. ठिगळे, मराठी विभागप्रमुख डॉ.के.एम.भवारी, श्री.एस.जी. कापसे इत्यादी लेखक विद्यार्थ्याशी संवाद साधणार आहेत. कार्यशाळेच्या व ग्रंथप्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे असणार आहेत. हा 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम सर्वांसाठी खुले असून महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक,शिक्षक, लेखक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्र.प्राचार्य डॉ. पोरे यांनी केले आहे.



(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)