Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा.डॉ.रुपाली कांबळे यांचा दुर्गत्रिकुट साहसी ट्रेकर्स मोहीमेमध्ये सहभाग

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा.डॉ.रुपाली कांबळे यांचा दुर्गत्रिकुट साहसी ट्रेकर्स मोहीमेमध्ये सहभाग


सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा .डॉ.रुपाली कांबळे यांनी दुर्गत्रिकुट साहसी ट्रेकर्स मोहीममध्ये सहभाग घेतला. नाशिक जिल्हयातील इगतपुरी येथील सह्याद्री डोंगर रांगेतील कळसुबाई शिखराच्या जवळ असणारे दुर्गत्रिकूट म्हणजे "अलंग मदन कुलंग"या जोड किल्ल्यामध्ये सांगलीच्या सह्याद्री व्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रुपच्या समवेत दुर्गत्रिकूट अतिशय अवघड समजला जाणारा  रेंज ट्रेक दोन दिवसात यशस्वीरीत्या पूर्ण केला.

त्यांनी या अगोदर भैरवगड, वासोटा, राजगड, रायगड, रायरेश्वर, असे अनेक ट्रेक केले आहेत. तसेच त्यांनी विविध 21 कि. मी. व 10 कि. मी.मॅराथॉन मध्ये ही सहभाग घेतला आहे.
        
सदरची ट्रेकिंग मोहीम पूर्ण केल्याच्या यशाबद्दल शालेय शिक्षण विभागाच्या संचालिका मा. विजयमाला कदम, भारती विद्यापीठाचे  कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, सहकार्यवाह डॉ. के. डी.जाधव, डॉ. एम. एस. सगरे, विभागीय संचालक डॉ. एच.एम. कदम यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा.डॉ. एस. व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ. ए .आर.सुपले, प्रा. ए .एल .जाधव,महिला विकास समितीच्या समन्वयक प्रा.कु.भारती भावीकट्टी  सर्व प्राध्यापक आणि आजी-माजी विद्यार्थी यांनी डॉ. रुपाली कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील ट्रेकिंग मोहीम कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या मोहिमेच्या यशाच्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)