Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे होते. यावेळी प्रा.आर.एम.पवार, आर.व्ही.पाटील,आर.जी. मगदूम, व्ही.व्ही.पाटील, एस. आर.शेटे व प्रा.प्रभा पाटील, प्रा .एम. एच.पाटील, प्रा.पी. एस. डिकुळे,प्रा.भारती भाविकट्टी, डॉ.विकास आवळे, प्रा.एस. टी. माने इ.यांनी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी डॉ.पतंगराव कदम व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
   
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद नेहमी वाढला पाहिजे. महाविद्यालयातील जे माजी विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन महाविद्यालयाप्रती असलेले ऋणानुबंध अधिक दृढ केले पाहिजेत. या कार्यक्रमानिमित्ताने सर्व माजी शिक्षकांना विद्यार्थ्यांना एकत्रित भेटावयास मिळाले. हे माजी विद्यार्थ्यांचे भाग्यच आहे. सर्व विद्यार्थ्यांचे नाव न घेता एकत्रित कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे दरवाजे आपल्यासाठी सदैव खुले असतील. प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे आवाहन या वेळी त्यांनी केले.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रा.आर.एम.पवार, मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाची संपत्ती असते. अशा विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये महाविद्यालयातून मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांसाठी शिदोरी असते. हे संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात. 


यावेळी डॉ. सौ. प्रभा पाटील म्हणाल्या की, ध्येय, कष्ट आणि जिज्ञासा प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगी जोपासले तर त्यातून एक चांगला नागरिक घडू शकतो. आपल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा नेहमीच आनंददायी आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असतो. असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. 
    
या वेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.धनश्री हावळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण कुशिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मयुरेश मडूरकर यांनी केले. या कार्यक्रमास संयोजन विवेक भोकरे,अनिरुद्ध पाटील, पुनम पाटील, विक्रम जाधव, प्रियांका मुदाळकर, स्मिताली विभुते सुप्रिया आनेकर, मेगा बोधले स्वप्निल पाटील यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)