Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात समाज प्रबोधन सप्ताह उपक्रमाचे आयोजन

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात 'समाज प्रबोधन सप्ताह' उपक्रमाचे आयोजन


सांगली:डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलपती डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह आम. डॉ. विश्वजीत कदम यांच्या १३ जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त 'समाज प्रबोधन सप्ताह' उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय दरवर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा 'समाज प्रबोधन सप्ताह' निमित्त विविध स्तुत्य उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच विविध व्याख्याने इ.उपक्रम असतील.
यामध्ये दि. ९ जानेवारी ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत विविध तज्ञ प्राध्यापक वेगवेगळ्या ग्रामीण भागांमध्ये आपले सामाजिक विचार व समाज प्रबोधन करतील. या आयोजनाची सुरुवात  प्राणीशास्त्र विभागाकडून 'विषारी व बिनविषारी सापांच्या प्रजातीची ओळख व जनजागृती' या विषयावर डॉ.वर्षा कुंभार, प्रा. एन.जी.बहिरम व इतर सहाय्यक प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनानुसार 'खटाव' या गावांमध्ये व्याख्यानाचे ९ जानेवारी आयोजन करण्यात आलेले आहे. तर १० जानेवारी  रोजी रसायनशास्त्र विभागाकडून विभागाकडून 'प्लास्टिक पेस्टिसाइड रासायनिक खते, माती व पाणी परीक्षण काळाची गरज' या विषयावर डॉ. महेश कोल्हाळ, डॉ. टी. आर. लोहार डॉ. ए. एम. सरगर, डॉ. आर.एन. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार 'माळवाडी' या गावांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.११ जानेवारी रोजी एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. महेश कोल्हाळ व त्यांच्या विभागाकडून 'कारगिल युद्धातील शूरवीराचे अनुभव व देश सेवेची प्रेरणा' या विषयावर माजी सैनिक मा. नेंमदादा पाटील मार्गदर्शन करतील. तसेच 'औषधी वनस्पती ओळख व संवर्धन' (आजीचा बटवा) या विषयावर वनस्पतीशास्त्र विभागाकडून डॉ. व्ही.बी.आवळे,प्रा.एच. व्ही.वांगीकर, प्रा. एम.पी. गावीत हे ‘वसगडे' या गावांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. १२ जानेवारी या दिवशी 'डॉल्बी व लेसर चे दुष्परिणाम' या विषयावर भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.पी.नाडे तसेच प्रा. एन.एन.नाटके, प्रा. वाय.सी. धुळगंड हे 'चोपडेवाडी या गावांमध्ये संबोधित करतील. 
तसेच १३ जानेवारी रोजी 'योगा' या विषयावर शारीरिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली कांबळे 'सावली बेघर निवारा केंद्र' सांगली येथे मार्गदर्शन करतील. तर १५ जानेवारी रोजी 'आर्थिक साक्षरता' या विषयावर वाणिज्य विभागप्रमुख डॉ. ए. एच.जाधव आणि प्रा.आर.आर. गोडबोले सांडगेवाडी येथे मार्गदर्शन करतील. तर याच दिवशी इंग्रजी विभागाकडून 'मास्टरींग रायटिंग स्किल्स' या विषयावर इंग्रजी विभागप्रमुख प्रा. कु. रोहिणी वाघमारे व डॉ. एन.डी. पवार 'भिलवडी' या गावी व्याख्यान देतील. १६ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. कु.जयश्री हाटकर यांच्या मार्गदर्शनानुसार भावार्थ बुक सप्लायर्स सांगली यांच्यामार्फत महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. १७ जानेवारी रोजी 'डिजिटल साक्षरता' या विषयावर अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संजय ठिगळे व प्रा. ए.ए.पोळ यांचे सावंतपूर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिमखाना विभागप्रमुख डॉ. ए.ए.तुपे यांनी २१ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन केले आहे. वरील सर्व प्रत्येक गावातील व महाविद्यालयातील उपक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
       
या समाज प्रबोधन सप्ताह' निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण, गुणवत्तापूर्ण विकासासाठी तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच समाजामध्ये एक सामाजिक जाणीव निर्माण होईल या जाणिवेतून डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याची माहिती सर्वांना होईल.या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी केले.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)