डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे, स्वप्निल नलावडे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तीन किलोमीटर अंतरावराच्या या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण ३११ स्पर्धकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महिला व पुरुष गटात स्वतंत्रपणे तीन क्रमांक काढण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना महाविद्यालयाच्या वतीने टी-शर्ट आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. सदर स्पर्धा पार पाडण्याकरिता मा. आनंदराव नलवडे (भाऊ) मा. प्रमोद सूर्यवंशी, छत्रपती पुरस्कार विजेते मा. शिवाजीराव मोहिते, मा. मयूर पाटील (शेठ) मा. मंगेश चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. एन.सी.सी. विभागातील सर्व कॅडेट्सनी स्वयंसेवक म्हणून आपली जबाबदारी उत्तम पार पाडली. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे यांनी या मॅरेथॉनचे नेटके आयोजन केल्याबद्दल सांगली परिसरातील मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment