डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थीनी निकिता पवार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थीनी निकिता पवार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे, डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगली मधील बी. ए. भाग १ ची विद्यार्थिनी निकिता पवार हिची क्रॉस कंट्री या क्रीडा प्रकारात अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली. तसेच शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये ८०० मीटर या क्रीडा प्रकारात तिने तृतीय क्रमांक मिळवला. सदर विद्यार्थिनीचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी केले. यावेळी एन. सी. सी. विभाग प्रमुख डॉ. महेश कोल्हाळ व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दादा नाडे उपस्थित होते ल. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे यांचे मार्गदर्शन लाभले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment