डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने औषधी वनस्पती ओळख व संवर्धन या विषयावर जनजागृती कार्यक्रम
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने 'औषधी वनस्पती ओळख व संवर्धन' या विषयावर जनजागृती कार्यक्रम
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामधील वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने भारती विद्यापीठाचे संस्थापक - कुलगुरू डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा. आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'समाजप्रबोधन सप्ताह' अंतर्गत औषधी वनस्पती ओळख व संवर्धन (आजीचा बटवा) या विषयावर जनजागृती कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील मु. पो. वसगडे ता. पलूस या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, वसगडे गावचे सरपंच मा. सौ वृषाली काशीद, उपसरपंच मा. श्री. अनिल पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. आनंदराव हजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कोडग, श्री. जाधव सर व सौ. पुजारी मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, कार्यक्रम समन्वयक वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. बी. आवळे, श्री.एच. व्ही. वांगीकर, श्री. एम. पी. गावित उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ व बेल, आवळा, कॉस्टस, कोरफड, तुळस, शतावरी, अर्जुन, बहावा, सारखे औषधी वनस्पती भेट देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भीत्तीपत्रिकेद्वारे उपस्थितांना आयुर्वेदिक शाम्पू, अडुळसा काढा, संधिवात काढा, डाळिंब, कांदा, गुळवेल, निम, केळी, कोरफड, माका, शेवगा यासारख्या विविध औषधी वनस्पतींचे व त्यांच्या वापराबद्दल माहिती करून दिले.
भित्तीपत्रिकेच्या माहितीनंतर प्रमुख वक्ते श्री. एम.पी. गावित यांनी औषधी वनस्पती कशाला म्हणायचं? त्या कशा ओळखाव्यात? व त्यांचे संवर्धन कसे करावे? याबद्दल मार्गदर्शन केलं. तसेच अश्वगंधा, पुनर्नवा, गोखरू,पानफुटी, चित्रक, अतिबला, आघाडा, अशा निवडक वनस्पतींची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना औषधी वनस्पतींची लागवड व त्याचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व पटवून दिले. तसेच समाजातील लोकांनी याचे जतन व संवर्धन केले पाहिजे तरच नैसर्गिक साधनसंपत्ती कायमस्वरूपी टिकून राहील. असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. एच. व्ही. वांगीकर यांनी केले.या कार्यक्रमास ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment