Header Ads

Loknyay Marathi

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून करिअर घडवा :श्री. संजय पवार

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून करिअर घडवा :श्री. संजय पवार


(डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात अमृतवेल करिअर कट्टानिर्मित प्रकट मुलाखत संपन्न)


सांगली : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयांमध्ये आवड आहे त्या विषयातून आपले करिअर घडवले पाहिजे. करिअर करण्याची इच्छा अंतर्मनातून निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी वाचनाची सवय व अभ्यासाची आवड असायला हवी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यासात साचेबद्धपणातून करिअर घडवा असे मत मा.संजय पवार यांनी प्रकट मुलाखती दरम्यान केले.
       
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अमृतवेल करिअर कट्टा निर्मित सांगली जिल्ह्याचे सुपुत्र व भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती झालेले (IAS) श्री.संजय पवार यांची प्रकट मुलाखत संपन्न झाली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या निवृत्त विभागीय आयुक्त (नाशिक) श्री. राजाराम माने अध्यक्षस्थानी होते. या वेळी स्वागताध्यक्ष म्हणून भारती सहकारी बँकचे संचालक डॉ.जितेश कदम तसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे व उपप्राचार्य डॉ . अमित सुपले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संजय ठिगळे,कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए.एल.जाधव, स्पर्धा परीक्षेचे समन्वयक डॉ. महेश कोल्हाळ उपस्थित होते. यावेळी डॉ.पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
    
याप्रसंगी पत्रकार हणमंत पाटील, जयसिंग कुंभार, कुलदीप माने, धर्मेंद्र पवार आणि प्रा.संजय ठिगळे यांनी वेगवेगळ्या प्रश्नावर मा.संजय पवार यांची प्रकट मुलाखत घेतली. या उपक्रमाचे आयोजन स्पर्धा परीक्षा विभाग, अर्थशास्त्र विभाग आणि अमृतवेल ग्रामविकास प्रबोधनी यांच्या वतीने करण्यात आले.
       
या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त विभागीय आयुक्त (नाशिक) मा.राजाराम माने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनाच्या सवयीमुळे कल्पनाशक्ती करण्याची सवय लागते. जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुमची कल्पनाशक्तीचा विकास होत नाही. असे मनोगत व्यक्त केले.
     
यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भारती सहकारी बँकचे संचालक,डॉ.जितेश कदम यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींचा उजाळा करून दिला. व आलेले अनुभव सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.
     
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.पोरे म्हणाले की,आपल्या महाविद्यालयात होतकरु माजी विद्यार्थी असून ते अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत, त्यांचा अनुभव व आदर्श सद्याचे विद्यार्थी घेत आहेत. तसेच महाविद्यालयात विद्यार्थी प्रेरित व समाजप्रेरित असे कृतिशील उपक्रम राबवले जात असून यामधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडून येत आहे असे प्रतिपादन केले.
      
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून मनोगते व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. महेश कोल्हाळ यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)