Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने आर्थिक साक्षरता कार्यक्रम

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने आर्थिक साक्षरता कार्यक्रम


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलगुरू डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व मा. आम.डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 'समाज प्रबोधन सप्ताह 'साजरा करण्यात आला. वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित आर्थिक साक्षरता व जनजागृती कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील मु .पो. सांडगेवाडी ता. पलूस‌ या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे, सांडगेवाडी गावचे सरपंच मा. अमर वडार, माजी उपसरपंच मा. सुनील सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष शशिकांत सांडगे, कार्यक्रम समन्वयक व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अनिकेत जाधव, सहसमन्वयक प्रा. राहुल गोडबोले, प्रा. पुनम रासनकर, प्रा. अर्चना पाटील, प्रा. प्रियांका धुळे इ. मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक राहुल गोडबोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अनिकेत जाधव यांनी आर्थिक साक्षरते बाबत अधिक माहिती सांगताना बचत व गुंतवणूक यातील फरक व गुंतवणुकीचे विविध पर्याय स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आजच्या युगात आर्थिक साक्षरताच व्यक्तीला कौटुंबिक दृष्ट्या आर्थिक समृद्ध बनू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आर्थिक साक्षर बनण्यासाठी आर्थिक व्यवहारांबाबत शिक्षण घेणे काळाची गरज आहे. माननीय प्राचार्यां डॉ. एस. व्ही. पोरे हे विद्यार्थी व उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले की आर्थिक साक्षरता हा आर्थिक दृष्ट्या संपन्न बनण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील राजमार्ग आहे. तसेच त्यांनी अशाप्रकारे विविध विषयांवर गावात येऊन प्रबोधन करण्याची तयारी दाखवली कार्यक्रमाचे शेवटी प्राध्यापिका अर्चना पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
    
सूत्रसंचालन श्री. विजय काशीद यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, सांडगेवाडी गावचे सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)