Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे, डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे होते. या कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कऱण्यात आले.
     

याप्रसंगी  संगणक विभागाचे प्रा.अमोल वंडे मनोगत  व्यक्त करताना म्हणाले की, सुभाष चंद्र बोस यांनी  वयाच्या १५ व्या वर्षीच स्वामी विवेकानंदाचे सर्व साहित्य वाचून काढले. तसेच नेताजींच्याकडे धैर्य, समर्पण, स्वातंत्र्यप्रेम, अंगीकृत होते. 'तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा' असे ते म्हणत. १९३८ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले, नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. या त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. व राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. हेच त्यांना या जयंतीनिमित्त अभिवादन ठरेल.
        
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. प्र. प्राचार्य  डॉ. पोरे म्हणाले की , भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती देशभरात साजरी केली जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची राष्ट्रभक्ती व त्यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना यांचे महत्त्वाचे स्थान आहे. तसेच त्यांच्या क्रांतिकारी विचारांची व त्यांनी केलेल्या कार्याची व संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांना  झाली पाहिजे.  त्यातूनच विद्यार्थ्यांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते असे प्रतिपादन केले. 
      

या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना सातपुते यांनी केले  तर आभार डॉ. रूपाली कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)