डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही. पोरे यांच्या शुभहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
या दिनाचे महत्त्व सांगताना प्र. प्राचार्य डॉ. पोरे म्हणाले की, संपूर्ण जगभरात सर्वात मोठे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. २६ जानेवारी या दिवशी सर्व भारतीय एकत्र येऊन हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांमुळेच आज भारताची एकता टिकून आहे. या मूल्यांचा आदर करून प्रत्येक नागरिकांनी ती आत्मसात केली पाहिजेत, सामाजिक जबाबदारीची बांधिलकी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विद्यार्थी दशेतच असली पाहिजे. विद्यार्थी हा दयाळू असला पाहिजे, काळजीवाहु विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामधून दरवर्षी समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करेल असा नागरिक घडला पाहिजे.
राष्ट्राविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रअभिमान, प्रेम तसेच नैतिकता निर्माण झाली पाहिजे. ही सर्व जबाबदारी आपणा सर्वांची आहे तरच आपण भारताबद्दल एक मोठं स्वप्न पाहू शकतो आणि या सगळ्या जबाबदारीची जाणीव मी स्वतः माझ्यापासून आपणा सर्वांच्या सहित स्वीकारतो. तरच हा ७६ वा प्रजासत्ताक दिन आपण खऱ्या अर्थाने साजरा केला याला काहीतरी अर्थ राहील. असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगते व्यक्त केली.तसेच एन.एन.सी. विभागातर्फे मानवंदना,संचलन करण्यात आले.
या प्रसंगी वाय.सी. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा चे रजिस्टार आर. वाय. गायकवाड, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.ए.एल.जाधव, क्रीडा विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे, एन.सी.सी. विभागप्रमुख डॉ. महेश कोल्हाळ व शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.रूपाली कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment