डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मधून न्यायालयीन लिपिक पदी निवड
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मधून न्यायालयीन लिपिक पदी निवड
सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील एम.एस्सी.भाग- २ मधील रसायनशास्त्र विभागाचा विद्यार्थी श्री.गुरुप्रसाद अशोक हाक्के याची स्पर्धा परीक्षा मधून रायगड येथील न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिक पदी निवड झाली. अशाप्रकारे जिल्हा न्यायालयीन स्तरावरील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांने हे यश मिळवून भारती विद्यापीठ आणि डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले .
या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही. पोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. तसेच भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आदरणीय विजयमाला कदम उर्फ वहिनीसाहेब तसेच सांगली विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम. कदम व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा.अरुण जाधव, स्पर्धा परीक्षेचे समन्वयक डॉ. महेश कोल्हाळ, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.अमोल तुपे यांनी या विद्यार्थ्याचे शाबासकी देऊन त्याचे कौतुक केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment