Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे पाश्चर जयंतीनिमित्त सूक्ष्मजीव शब्दकोडे स्पर्धा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे पाश्चर जयंतीनिमित्त सूक्ष्मजीव शब्दकोडे स्पर्धा संपन्न


येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात दि. २७/१२/२०२४ रोजी लुई पाश्चर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस्. व्ही. पोरे अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत असताना ते म्हणाले पाश्चर हे एक उत्तम रसायनशास्त्रज्ञ होते, त्याचबरोबर ते उत्तम सुक्ष्मजीवशास्त्रज्ञही होते. सुक्ष्मजीवशास्त्रात पाश्चर यांनी भरीव कामगिरी केली आहे. पाश्चरायझेशनसारख्या प्रक्रियेचा पाया त्यांनी रचला की, जी प्रक्रिया आजही दुध पाश्चरायझेशनसाठी वापरली जाते. ज्यामुळे दुधाची टिकण्याची क्षमता वाढते. सदर दिनाचे औचित्य साधून सुक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे शब्दकोडे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेकरिता पदवी व पदव्यूत्तर सुक्ष्मजीवशास्त्र विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा .कु. भारती के. भावीकट्टी यांनी प्रभारी प्राचार्य डॉ. एस्. व्ही. पोरे यांचे पुष्पगुच्छ  देवून स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत आयोजित होत असणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. अभ्यासपूरक उपक्रमां मुळे विद्यार्थ्यांची त्या विषयात गोडी वाढते त्यामुळे अशा उपक्रमात विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घ्यावा असे आवाहन केले. यानंतर डॉ. बी. बी. बल्लाळ यांनी पाश्चर यांनी रेबीज सारख्या प्रामुख्याने श्वानदंशापासून होणाऱ्या दुर्दम्य आजारावरील लसीचा शोध लावला याचबरोबर कोंबड्यात होणाऱ्या कॅालरासारख्या आजारावर उपयुक्त लस शोधून काढली त्या विषयी माहिती दिली. यानंतर  एम्.एस्सी भाग १ मधील श्री. श्रेयस शेटे एम्.एस्सी भाग २ मधील कु. सिमरन हिंगणे या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त भाषणे केली. सदर कार्यक्रमाकरिता पदवी व पदव्युत्तर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ए. ए. मुलाणी केले तर प्रा. व्ही. एस्. पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. एम्. एस्. पटेल व प्रा. एस्. एस्. पाटील उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)