डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, अंतर्गत गुणवत्ता हमी व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय मतदार दिवस' या निमित्ताने राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रुपाली कांबळे, प्रा.शंकर पाकले इ. उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. पोरे मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांनी मतदान नोंदणी केली आहे किंवा नाही हे पाहिले जाईल. तसेच मतदानाच्या वेळी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये तसेच आपण केलेल्या मतदानाची खूप मोठी किंमत असते, असा दृढ संकल्प प्रत्येक विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. यातूनच मतदारा चे महत्व लक्षात येते.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.आवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले की, राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व व विशेषतः नवमतदार नोंदणीसाठी जनजागृती करणे मुख्य उद्देश आहे. विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्य यांचा मार्फत मतदारा बाबत प्रबोधन केले जाते.
या कार्यक्रमामध्ये मतदाराची शपथ डॉ.वंदना सातपुते यांनी करुन दिली. तर सूत्रसंचालन डॉ. रूपाली कांबळे यांनी केले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment