Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात समाज प्रबोधन सप्ताहनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'समाज प्रबोधन सप्ताहनिमित्त' विविध स्पर्धांचे आयोजन


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व मा. आम. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधन सप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात अनेक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व, स्पर्धा व रांगोळी स्पर्धा इ. उपक्रम संपन्न झाले. 
       
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे विविध कला प्रकारामध्ये भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून येतो. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन कलागुणांचा विकास करून दाखवावा असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी केले.                                  

या स्पर्धेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

निबंध स्पर्धा - कु.अक्षता  कोळी (प्रथम) इयत्ता ११ वी आर्ट्स, कु.सिमरन पाटील (द्वितीय) इयत्ता १२ वी विज्ञान, कु.आस्मिन मुल्ला (तृतीय) इयत्ता १२ वी विज्ञान या स्पर्धेचे परीक्षण - प्रा.काटकर आर.एस.
प्रा. पाकले एस. डी. यांनी केले.
    
वक्तृत्व स्पर्धा- गौरव कुलकर्णी(प्रथम) इ.११ वी एम. एल.टी.,प्रज्योत सावंत (द्वितीय) इ.११ वी विज्ञान, कु.सुजाता म्हारगुडे (तृतीय) इ.१२ वी. एम. एल. टी. उत्तेजनार्थ कु. समीक्षा कणके (इयत्ता १२ वी विज्ञान), अभिनव देसाई (इयत्ता ११ वी आर्ट्स) याचे परीक्षक प्रा. डॉ. भवारी के. एम. व प्रा. सौ. वासंती गावडे  होते.
      
रांगोळी स्पर्धा- जूनियर विभाग- कु.सुजाता म्हारगुडे (प्रथम) इ.१२ वी एम एल टी, कु.अक्षता कोळी(द्वितीय) इ.
११ वी आर्ट्स, कु.ऋग्वेदी कदम(तृतीय) इ. १२ वी एम एल टी.
उत्तेजनार्थ—कु.भाग्यश्री कदम (इ.१२ वी एम एल टी), कु. प्रियांका चोरोसे (इ.१२ वी एम एल टी), कु.भाग्यश्री पाटील (इ.१२ वी एम एल टी)
  
सीनियर विभाग-अन्नू केवट (प्रथम) बी.एससी.भाग-३,
आशिष पाटील (द्वितीय) बी.एससी.भाग-३, कु. नम्रता मगदूम (तृतीय) बी.एससी. भाग-३ 
उत्तेजनात- कु. अल्फिया मुल्ला   (बी.एस्सी.भाग-३)
 
याचे परीक्षक म्हणून प्रा. सौ. वासंती गावडे  व सौ. माने आर. एस. काम पाहिले.  
        
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.ए. एल.जाधव तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)