डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मोती संस्कृती- एक वैज्ञानिक व व्यावसायिक दृष्टिकोन कार्यशाळा संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मोती संस्कृती- एक वैज्ञानिक व व्यावसायिक दृष्टिकोन कार्यशाळा संपन्न
सांगली:येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने
मोती संस्कृती- एक वैज्ञानिक व व्यावसायिक दृष्टिकोन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव, कार्यक्रम समन्वयक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार तसेच प्रा. नलेश बहिरम उपस्थित होते.
वरील संबंधित विषयावर मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. ए. ए. केंगार म्हणाल्या की, भारत हा कृषिप्रधान देश असून कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन हे फायदेशीर रोजगार आहेत म्हणून ते ओळखले जातात. तसेच मोत्यांची लागवड करून देखील चांगला नफा कमवता येतो. शेतकऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.मोत्यांची उत्पादन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामधे ऑयस्टर ८-१० महिने पाण्यात पाळले जातात. मोत्यांची शेती कशी केली पाहिजे, मोती कसे तयार केले जातात, मोत्यांच्या शेतीसाठी लागणारा अंदाजे खर्च व उत्पादन, मोती शेतीची आव्हाने व मोती शेती प्रशिक्षण केंद्रे आपल्या भारतात कोणकोणत्या ठिकाणी आहेत, त्यावर उपाययोजना तसेच विद्यार्थ्यांना मोत्याची शेती करणे हा चांगला रोजगाराचा पर्याय असू शकतो. अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सखोल चर्चा केली.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. पोरे म्हणाले की, मोती शेती उद्योग हा कुटीर उद्योग म्हणून शेतकऱ्यांनी, तरुण बेरोजगारांनी याकडे पाहावे. तसेच या छोट्याश्या प्रशिक्षणानंतर मोती शेती हा उद्योग सुरु करावा. आपल्याकडे गोडया पाण्याची उपलब्धता खूप आहे, शिवाय अत्यल्प खर्चाचा, कमी मेहनतीचा हा मोती उद्योग आहे. अशा प्रचंड मागणीचा, पैसा मिळवून देणारा हा उद्योग आहे. म्हणून खेड्यापाड्यात शेतीच्या इतर पूरक व्यवसायाबरोबर गोडया पाण्यात मोती संवर्धन व्यवसाय सुरु करावा.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. प्रियांका जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.नलेश बहिरम यांनी केले. या कार्यक्रमास वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment