डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने समाज प्रबोधन सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने समाज प्रबोधन सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलगुरू डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व मा. आ.डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 'समाज प्रबोधन सप्ताह 'साजरा करण्यात आला. शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित 'योगा' या विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिक सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्र या ठिकाणी घेण्यात आले.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे, सावली बेघर निवारा केंद्राचे संचालक मुस्तफा नदाफ, व रफिक नदाफ कार्यक्रम समन्वयक व शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ . रुपाली कांबळे, प्रा. विनायक पवार इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. व्ही.पोरे म्हणाले की, योगामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. योगा हा असा व्यायाम प्रकार आहे की तो लहान मुलांच्या पासून ते वृद्धांच्या पर्यंत करता येऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने जीवनात योगाला खूप महत्त्व आहे योगामुळे शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते. दररोज योगाभ्यास केल्याने उत्साह आनंदी जीवन जगण्यास मदत होते असे प्रतिपादन केले.
यावेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.रुपाली कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की योगामुळे आपल्या शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते. योगामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास मदत होते.
त्यांना मार्गदर्शन करत असताना सोप्या पद्धतीची आसने त्यांच्या वयोमानानुसार त्यांच्याकडून करून घेण्यात आली व त्यांना दररोज योगा केल्याने चांगला फायदा होतो याचे महत्व पटवून दिले.
प्रा. विनायक पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, योगा व प्राणायमा मुळे मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.रुपाली कांबळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विनायक पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment