डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांची जयंती साजरी
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांची जयंती साजरी
सांगली :येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमाचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र.प्राचार्य डॉ.एस व्ही.पोरे म्हणाले की, ज्यावेळी स्त्रियांना समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा सामाजिक दर्जा दिला जात नव्हता, अशा वेळी स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवीन दिशा दिली व त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून दिली. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहेत. पण यासाठी प्रगतीची व्दारे उघडण्यासाठी समाजाशी फार मोठा संघर्ष केलाय. सावित्रीबाई या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका ठरल्या, त्यांनी सर्व जातीधर्मासाठी पहिली मुलींची शाळा पुणे येथे भिडे वाड्यात १ जानेवारी १८४८ मध्ये सुरू केली. आज कर्तुत्ववान अशा सावित्रीबाई फुलेंची जयंती ज्योतिबा फुलेंच्या सर्वच समाजकार्यात त्यांनी मोठी साथ दिली. स्त्रियांचे केशवपन थांबवण्यासाठी कार्य केले. निराधार विधवांना घरी आसरा दिला. विधवा पुर्नविवाहाला साथ दिली. सावित्रीबाईं फुले या संवेदनशील असल्यामुळे त्यांना समाजहिताची तळमळ असल्याने जनजागृतीसाठी लिखाण केले. जगाच्या विस्तिर्ण आकाशात आज भारतीय महिलांचा झेंडा सर्वच क्षेत्रांत मानाने उंचच उंच ठरतोय तो त्यांच्याच योगदानाने. अश्या ह्या 'क्रांतीज्योती' सावित्रीबाईं फुलेंना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन असे मत व्यक्त केले.
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले.तर आभार प्रा.रोहिणी वाघमारे यांनी केले.या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment