डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने समाज प्रबोधन सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने समाज प्रबोधन सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलगुरू डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व मा. आ.डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 'समाज प्रबोधन सप्ताह 'साजरा करण्यात आला. इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित 'मास्टरिंग रायटींग स्किल्स' या विषयावर व्याख्यान सांगली जिल्ह्यातील मु .पो. भिलवडी ता. पलूस या ठिकाणी घेण्यात आले.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे,
सेकंडरी स्कूल भिलवडी संस्थेचे सचिव श्री.मानसिंग हाके, मुख्याध्यापक श्री.संभाजी मोरे, उपमुख्याध्यापक श्री.विजय तेली, कार्यक्रम समन्वयक व इंग्रजी विभागप्रमुख प्रा . रोहिणी वाघमारे डॉ. नरेश पवार, प्रा. ओमकार चव्हाण, डॉ. रुपाली कांबळे इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. व्ही.पोरे म्हणाले की, इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्ये संपादन करणे हे आधुनिक काळाची गरज बनली आहे. तसेच इंग्रजी भाषेच्या कौशल्ये प्राप्तीनंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील सुसंधी विपुल प्रमाणात मिळू शकतात,त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषण कौशल्ये आत्मसात करावीत.
यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.रोहिणी वाघमारे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, प्रभावी इंग्रजी संप्रेषण होण्यासाठी प्रत्यक्ष शब्दाचा संदर्भ समजून घेणे, महत्त्वाचे आहे तसेच,इंग्रजी संभाषण कौशल्ये तुम्हाला यशाची नवीन कवाडे उघडुन देतात, त्यामुळे इंग्रजीचे प्रभुत्व अत्यावश्यक आहे.
यानंतर डॉ.नरेश पवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, इंग्रजीतील प्रभावी संप्रेषणामुळे नवीन कौशल्ये शिकण्याच्या आणि आत्मसात करण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडतो, त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले पाहिजे.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.रोहिणी वाघमारे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.ओमकार चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment