Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय अंतर विभागीय आईस-स्टॉक क्रीडा स्पर्धेत तृतीय

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय 
अंतर विभागीय आईस-स्टॉक क्रीडा स्पर्धेत तृतीय

 

सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय आईस स्टॉक क्रीडा स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.

याबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस.व्ही.पोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       
सदर स्पर्धा दि.३० डिसेंबर २०२४ रोजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर या ठिकाणी पार पडल्या.यावेळी एन. सी. सी. विभाग प्रमुख डॉ. महेश कोल्हाळ व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दादा नाडे उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अमर तुपे यांचे मार्गदर्शन लाभले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)