Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यासाठी व्याख्यानाचे आयोजन

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यासाठी व्याख्यानाचे आयोजन

सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगली आणि कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'विज्ञान शाखेतील करिअर संधी' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस.व्ही.पोरे, तज्ञ व मार्गदर्शक प्रा.श्रीकांत निकम, प्रा.तेजस पाटील व कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए.एल जाधव उपस्थित होते.
         
यावेळी प्रमुख वक्ते प्रा.श्रीकांत निकम मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, इंजिनिरींग क्षेत्रात असणाऱ्या ऑफिस डेवलोपमेंट, टाऊन प्लॅनिंग,वास्तूशास्त्र, विविध फूड डिझाईन, इंटरेर डिझाईन, लँडस्केप डिझाईन, वेगवेगळ्या प्रकारचे मिळालेले पेटंट याबद्दल त्यांनी सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी केले.
         
प्रा.तेजस पाटील विद्यार्थ्यांना माहिती सांगताना म्हणाले की, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये फेलोशिप प्रोग्रॅम जे घेतले जातात ते भारतात व भारताबाहेर असतात त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना घ्यावा. विद्यार्थ्यांना ओव्हरऑल पर्सनॅलिटी या कोर्सेस च्या माध्यमातून कशी घडवून आणावी. यावेळी त्यांनी इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अगदी महाविद्यालय निर्मितीपासून मिळणाऱ्या संधी याची पी.पी. टी. च्या माध्यमाव्दारे संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.
     
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त प्र.प्राचार्य डॉ.पोरे म्हणाले की, १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात करिअर संधी व व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व दिले पाहिजे. करिअर संधी ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा विकास करणे व त्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करणे, त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करता येते असे मत व्यक्त केले.
     

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.ए. एल जाधव यांनी केले तर आभार प्रा . एस.बी.पाटील यांनी मानले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. आर.एस.काटकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.सौ. वासंती गावडे, प्रा. किशोर चौगुले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)