पाणी हे जीवन आहे पण दूषित पाणी जीवघेणे: डॉ. बी. बी. बल्लाळ
पाणी हे जीवन आहे पण दूषित पाणी जीवघेणे: डॉ. बी. बी. बल्लाळ
सांगली: पाणी हे जीवन आहे तसेच पाण्याविना सजीव सृष्टीचे अस्तित्व शक्य नाही परंतु हेच पाणी जर रोगकारक सुक्ष्मजीवांमुळे दूषित झाले जीवसुद्धा घेऊ शकते. सामान्य जनतेला याची इत्यंभूत माहिती देऊन लोकांना जागरुक करणे गरजेचे आहे. सूक्ष्मजीवांमुळे पाणी दूषित कसे होते, शोष खड्ड्यांची आवश्यकता, मानवाच्या व प्राण्यांच्या मलमूत्रामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण, जैविक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण याविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर त्यांनी दूषित पाण्यामुळे उद्भवणारे विविध आजार जसे की, विषमज्वर, काविळ, आमांश आणि कॅालरा यांची ओळख करून दिली.पाणी जीवन देतेही आणि घेतेही त्यामुळे वरील आजार टाळण्याकरिता विविध ऊपाययोजनांचा अवलंब केला पाहिजे. पिण्याच्या पाइपलाइनची योग्य ती काळजी घेणे, दूषित पाणी आल्यास योग्य ती प्रक्रिया करून मगच पिण्यासाठी वापरावे. पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून घ्यायला पाहिजे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. बी. बी.बल्लाळ यांनी केले.
येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व मा. आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधन सप्ताह “समाज प्रबोधन सप्ताहअंतर्गत “सुक्ष्मजीवांमुळे होणारे जलप्रदूषण: खबरदारी व उपाययोजना” या विषयावर सांगलीवाडी येथे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांचे स्वागत
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस्. व्ही. पोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्र.प्राचार्य डॉ.पोरे म्हणाले की, जलप्रदूषण ही सध्याच्या काळातील फार मोठी गंभीर समस्या बनत चालली आहे. जैविक कचऱ्याची व सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे कित्येक ठिकाणी ते पिण्याच्या पाण्यातच मिसळले जातात. परिणामी, विविध प्रकारचे हानिकारक जीवाणू व विषाणू पिण्याच्या पाण्यातून मानवी शरीरात प्रवेश करतात व मानवी आरोग्यास हानी पोहोचवतात. यासाठी पाणी तपासणी करणे महत्वाचे ठरते. तसेच या समस्येवर जनजागृतीसाठी व्याख्यान व चर्चासत्र आपण सांगलीवाडी येथे यापुढील काळात आयोजित करू व नागरिकांना पाणी तपासणी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा.भारती भावीकट्टी स्वागत व प्रास्ताविक करतेवेळी सांगलीतील पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण, शेरीनाल्याचा प्रश्न, आजवर केलेल्या उपाययोजना, दूषित पाण्याचे गंभीर परिणाम याबद्दल मत मांडले.
ग्रामस्थापैकी श्री. भिसे यांनी सांगलीवाडीत अशा जनजागृती पर कार्यक्रमाची गरज आहे, असे कार्यक्रम बाळूमामा मंदिर परिसरात सर्व उपस्थित स्त्रियांसाठी व भाविकांसाठी आयोजित करण्यात यावेत असा प्रस्ताव मांडला. तसेच या व्याख्यानात दिल्या गेलेल्या माहितीबद्दल त्यांनी खूप समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास शामराव पाटील, पांडुरंग सावंत, दिनकर पवार, चंद्रकांत पवार, विजय पाटील, आलम मुजावर, अर्जुन चौगुले, विलास कोळी, श्रीधर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ए. ए. मुलाणी यांनी केले तर आभार डॉ. एम्. जे. धनवडे यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता प्रा. एम्. एस्. पटेल, प्रा. एस्. एस्. पाटील व प्रा. व्ही. एस्. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment