अमृतवेल करिअर कट्ट्यावर संजय पवार यांची प्रकट मुलाखत!
अमृतवेल करिअर कट्ट्यावर संजय पवार यांची प्रकट मुलाखत!
सांगली: सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि नुकतेच भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती (IAS) झालेल्या संजय पवार यांची अमृतवेल करिअर कट्ट्यावर प्रकट मुलाखत शनिवार दि.१८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वा. घेण्यात येणार आहे. डाॅ. पतंगराव कदम महाविद्यालयात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्राचार्य.डॉ. संजय पोरे निमंत्रक प्रा. संजय ठिगळे आणि धर्मेंद्र पवार यांनी दिली.
भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा स्पर्धा परीक्षा विभाग, अर्थशास्त्र विभाग आणि अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यामाने या उप्रकमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त विभागीय आयुक्त नाशिक राजाराम माने तर डॉ.जितेश कदम स्वागताध्यक्ष आहेत. या करिअर कट्ट्यावर संजय पवार यांची मुलाखत पत्रकार हणमंत पाटील, जयसिंग कुंभार, कुलदीप माने आणि धर्मेंद्र पवार हे घेणार आहे. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्राचार्य डॉ.एस व्ही पोरे, उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ.महेश कोल्हाळ ज्यु. विभाग प्रमुख ए. एल. जाधव उपस्थित राहणार आहेत.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment