Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एच. एस. सी. बोर्ड परीक्षा बैठक व्यवस्थेचे आयोजन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात एच. एस. सी. बोर्ड परीक्षा बैठक व्यवस्थेचे आयोजन


सांगली: सांगलीवाडी येथील    डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेच्या  विद्यार्थ्यांसाठी एच.एस. सी. बोर्ड अंतर्गत फेब्रु/ मार्च २०२५ च्या परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही. पोरे यांनी दिली.
        
ते पुढे म्हणाले की, महाविद्यालय केंद्रांतर्गत या परीक्षा होत असून आमचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी मध्ये बैठक क्रमांक xo३४७०२ ते xo३५३३७ आहेत. तसेच लक्ष्मीबाई पाटील विद्यालय, सांगलीवाडी हे उपकेंद्र असून बैठक क्रमांक xo३५३३८ ते ३५५१२ पर्यंत आहेत. त्याचबरोबर श्री.दत्तात्रय चव्हाण कन्याशाळा, सांगलीवाडी हे सुध्दा उपकेंद्र असून येथे बैठक क्रमांक xo३५५१३ ते xo४०००९१ आहेत. असे एकूण ८८३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत. या परीक्षांसाठी केंद्र संचालक कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.एल. एल.जाधव व उपकेंद्र संचालक प्रा.आर.एस. काटकर असणार आहेत.
      
११ फेब्रुवारीपासून या परीक्षा सुरू होत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये या परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. तसेच उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहावे असे आवाहन प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही. पोरे यांनी केले आहे.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)