डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये समाज प्रबोधन सप्ताहनिमित्त माजी सैनिकाचे आत्मकथन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये समाज प्रबोधन सप्ताहनिमित्त माजी सैनिकाचे आत्मकथन
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलगुरू डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 'समाज प्रबोधन सप्ताह 'साजरा करण्यात आला. एन.सी.सी. विभागाच्या वतीने आयोजित'कारगिल युद्धातील शूरवीराचे अनुभव' या विषयावर माजी सैनिक आत्मकथनाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक हवालदार नेमगोंडा पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, एन.सी.सी विभागप्रमुख व स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. महेश कोल्हाळ व डॉ. अनिकेत जाधव इ.उपस्थित होते.
याप्रसंगी माजी सैनिक हवालदार नेमगोंडा पाटील यांनी कारगिल युद्धातील आलेला अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त करताना सन १९९९ मध्ये झालेल्या भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या कारगिल युद्धातील आलेले कठीण प्रसंगाचे कथन यावेळी विद्यार्थ्यांना केले. तसेच कारगिल युद्धामध्ये लढत असताना शत्रू कडून झालेल्या हल्ल्यामध्ये स्वतःच्या पायाला लागलेला गोळीचा थरारक अनुभवसुद्धा विद्यार्थ्यांना व्यथित केला. सैनिक दलामध्ये भरती झाल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत आलेले वेगवेगळे अनुभव व कठीण प्रसंग आपल्या आत्मकथनातून विद्यार्थ्यांना सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.अमित सुपले म्हणाले की, विद्यार्थ्यांनीसुद्धा देशसेवेची कास पकडून एन.सी.सी. भाग घ्यावा तसेच सैनिक दलामध्ये भरती व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांनी एन.सी.सी.च्या माध्यमातून शिस्त व आत्मसंरक्षण केले पाहिजे, तसेच स्वतःचे करिअर घडवून देशसेवा व समाजसेवा करावी, त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त एन.सी.सी.मध्ये सहभागी होऊन स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रांमध्ये उज्वल करिअर कसे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.महेश कोल्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र देशमुख यांनी केले. तर आभार डॉ.अमर तुपे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, एन.सी.सी.विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment