नेत्रदान पुण्याचे व समाजोपयोगी कार्य : डॉ. सुहास जोशी
नेत्रदान पुण्याचे व समाजोपयोगी कार्य : डॉ. सुहास जोशी
(डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नेत्रदान जनजागृती व्याख्यानाचे आयोजन)
सांगली: नेत्रदान करण्यासाठी कोणत्याही वयाची व्यक्ती इच्छापत्र भरू शकते. मृत्यूनंतर ६ तासांच्या आत नेत्रदान करावे लागते, त्यामुळे त्यासाठी वेळेत निर्णय घेणे महत्त्वाचे असते. समाजात नेत्रदानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी विविध संस्था व स्वयंसेवी संघटना कार्यरत आहेत. "मरणोत्तर जीवन दान" ही संकल्पना स्वीकारून आपण अंध व्यक्तींना एक नवा प्रकाश देऊ शकतो. तसेच अनेक अंध व्यक्तींना जग पाहण्याची संधी मिळावी यासाठी आपण नेत्रदान करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र दुसऱ्या गरजू व्यक्तीस दिल्यास, त्या अंध व्यक्तीचे आयुष्य प्रकाशमान होऊ शकते. त्यामुळे नेत्रदान हे अत्यंत पुण्याचे व समाजोपयोगी कार्य आहे असे प्रतिपादन डॉ. सुहास जोशी यांनी केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पोरे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रुपाली कांबळे, श्री . दिनकर पवार, एम. एल. टी. विभाग प्रमुख डॉ. ए. एस.सपकाळ, डॉ. वंदना सातपुते, प्रा. नलेश बहिरम आदि उपस्थित होते.
या वेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.व्ही. पोरे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मानवी शरीराचे सर्व अवयव सारखेच महत्त्वाचे असले, तरी डोळे अधिकच खास मानले जातात ते आपल्याला दृष्टी देतात तसेच जगाने देवू केलेल्या सौंदर्याचा आनंद घेण्यास मदत करतात अनेक प्रकारच्या दृष्टिदोषामुळे अनेक लोक त्यांची दृष्टी गमावतात आणि त्यांच्यासाठी जग हे अंधारमय होते, आज जगभरात अंधत्व हे एक चिंतेचे प्रमुख कारण आहे. नेत्रदानामुळे आपण त्यांना प्रकाशाची भेट देऊ शकतो.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा . रोहिणी वाघमारे यांनी केले. तर आभार प्रा.अमोल कुंभार यांनी मानले. तसेच या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक, स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment