वातावरणीय विज्ञान, हवामान अंदाज, हवामान बदल या विषयांवर संशोधन काळाची गरज: प्रो. डॉ. एस. व्ही. पोरे
वातावरणीय विज्ञान, हवामान अंदाज, हवामान बदल या विषयांवर संशोधन काळाची गरज: प्रो. डॉ. एस. व्ही. पोरे
(डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय,सांगली, हवामान बदल आणि शाश्वतता केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "हवामान बदल आणि भारतीय मान्सून" या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न)
सांगली:हवामान बदल म्हणजे पृथ्वीचे सरासरी तापमानात आणि हवामानाच्या स्वरूपात होणारे दीर्घकालीन बदल, जे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांमुळे होतात. हे बदल कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम करत असून, भविष्यात त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे असे प्रतिपादन डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो.डॉ. एस. व्ही. पोरे यांनी केले."हवामान बदल आणि भारतीय मान्सून" या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे हवामानशास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार याच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के याच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाच्या शाहू हॉल (सिनेट हॉल) मध्ये करण्यात आले. या कायर्शाळेसाठी शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभाग, पर्यावरणशास्त्र अधिविभाग, संख्याशास्त्र अधिविभाग आणि पदार्थ विज्ञान अधिविभागातील संशोधक व पदवीत्तर विद्यार्थ्यांनी हजेरी लावली याशिवाय शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली व इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आपली उपस्थिती नोंदवली. या कार्यशाळेसाठी एकूण २५० हुन अधिक लोकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी डॉ. डी.एच. पवार, प्रो. डॉ.पी. डी. राऊत, डॉ. व्ही. ए. चौगुले, डॉ. पी. टी. पाटील, डॉ. अमर तुपे आणि हवामानशास्त्रज्ञ डॉ. राणी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे येथून आलेल्या हवामानशास्त्रज्ञनी व्याखाने दिली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. हमजा वरिकोडण, डॉ. सुरज के. पी. आणि डॉ. प्रशांत पिल्लाई यांनी हवामानातील बदल आणि मान्सून वाऱ्याचे परिणाम तसेच ग्लोबल वार्मिंगचे संकेत या विषयांवर बोलताना १८६० ते २०२४ पर्यंतची निरीक्षणे सगळ्यांसमोर मांडली. या कार्यशाळेचे नियोजन आय.आय.टी.एम. मार्फत डॉ. टी. धर्मराज व डॉ.एस.डी.पवार तसेच शिवाजी विद्यापीठाकडून डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. दादा नाडे, डॉ. आसावरी जाधव, डॉ. एस. बी. महाडिक यांनी केले. या कार्यशाळेसाठी डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थितीत होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment