Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये एच.एस.सी.बोर्ड परीक्षेच्या भरारी पथकाची भेट

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये एच.एस.सी.बोर्ड परीक्षेच्या भरारी पथकाची भेट


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे इ.१२ वी विज्ञान शाखेची बैठक व्यवस्था करण्यात आली असून 


यावेळी एच. एस. सी. परीक्षा बोर्डाकडून आलेल्या भरारी पथकाने महाविद्यालयास भेट दिली. सकाळी ११.४५ वाजता या भरारी पथकामध्ये सौ. मीना शेंडगे (उपशिक्षणाधिकारी, सांगली) व त्यांच्यासमवेत सौ. नीता ढाले, सौ. सुजाता गावडे, श्री. संजय सावंत, श्री.नेमिनाथ कोथळे इत्यादी हजर होते. या सर्व सदस्यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली.
          
तसेच दुपारच्या सत्रात श्री.कृष्णा गणपती माळी (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सांगली) यांच्या समवेत डॉ. विक्रम बुटे (पशु विकास अधिकारी समडोळी) हजर होते. तसेच श्री. मदन यादव (विस्तार अधिकारी कृषी विभाग ) यांच्या समवेत सौ. श्रद्धा पवार उपस्थित होत्या. 
     
यावेळी परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्र विषयाचा पेपर सुरू होता. या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली. महाविद्यालयाने केलेल्या परीक्षा नियोजनाचे, परीक्षा विभागाचे तसेच बैठक व्यवस्थेचे कौतुक या भरारी पथकाने केले.
      
सदर परीक्षा केंद्राचे उत्तम असे नियोजन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, केंद्र संचालक प्रा. ए. एल.जाधव, उपकेंद्र संचालक प्रा. आर. एस. काटकर, प्रा. सौ. वासंती गावडे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)