डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाय योजना विषयावर व्याख्यान संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाय योजना' विषयावर व्याख्यान संपन्न
सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना मार्फत "अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाय योजना" या विषयावर प्रा. एस. बी. पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. लाडगांवकर, विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते एस. बी. पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून अंमली पदार्थांचे सेवन केल्यास त्यापासून होणारे संभाव्य धोके याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. आजची पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात कशी अडकली आहे व त्यातून सुटका करण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करू शकतो याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी 'दुर्दशा' ही स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त व निरोगी जीवन कसे जगावे याचा कानमंत्र दिला. माणसाचे आरोग्य म्हणजेच खरी संपत्ती आहे आणि ती वाचवायची असेल तर व्यसनाधीनते पासून लांब राहिले पाहिजे असाही सल्ला त्यांनी या वेळी दिला.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विकास आवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारुती धनवडे यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment