Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त प्राणीशास्त्र विभागात वैज्ञानिक मॉडेल स्पर्धाचे आयोजन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त प्राणीशास्त्र विभागात वैज्ञानिक मॉडेल स्पर्धाचे आयोजन


सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागामार्फत मॉडेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, श्री. बी. एच. मोरे, कार्यक्रम समन्वयक व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. कुंभार तसेच प्रा. नलेश बहिरम उपस्थित होते.
 
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे म्हणाले की २८ फेब्रुवारी हा दिवस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रेरणा मिळते. विज्ञानसंबंधी अशा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांची विज्ञानामध्ये रुची निर्माण होते. या उपक्रमासाठी प्राचार्यांनी प्राणीशास्त्र विभागाचे व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. 


या कार्यक्रमाप्रसंगी बी. एस्सी भाग दोन व भाग तीनच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर मॉडेल सादर केले व त्यांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे स्वागत बीएससी भाग तीनची विद्यार्थिनी कु. सादिया जमादार व प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. कुंभार यांनी केले, आभार प्रा. नलेश बहिरम यांनी मानले.

यावेळी प्राणीशास्त्र विभागातील प्रा. आर. एस. माने, प्रा. पी. डी. जाधव यांच्यासह वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)