डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात आरोग्य दिन संपन्न
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन संपन्न
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन एन.सी.सी. विभागामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.आनंद सपकाळ, एन.सी.सी.विभाग प्रमुख डॉ. महेश कोल्हाळ आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.आनंद सपकाळ मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोणत्याही आजाराला कोणतेही वय राहिलेले नाही. लहान मुलांना देखील रक्तदाब व मधुमेह यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे, याचे प्रमुख कारण आजची बदललेले जीवनशैली आहे. राहणीमान व आहारातील बदललेल्या सवयी, फास्टफूड खाणे, व्यायामाचा अभाव, मोबाईलचा अतिवापर या मोठ्या समस्या अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या आहेत या सर्व समस्यांवरती प्राथमिक उपचार कसे करावे यासंबंधीची काही प्रात्यक्षिके सादर केली.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य एस. व्ही. पोरे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सर्वसामान्य लोकांच्यामध्ये आरोग्य बाबत जागृती निर्माण करणे तसेच सार्वजनिक आरोग्यासंबंधित समस्येवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आरोग्य शिबिर भरवली पाहिजे, योग आणि रक्तदान शिबिर आयोजित करून प्रत्येक शाळा व महाविद्यालयात आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम घेतले पाहिजेत असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. महेश कोल्हाळ यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.अमर तुपे यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा. ओंकार चव्हाण यांनी केले तर या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment