yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी


सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.व्ही. पोरे, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. आत्माराम पोळ, डॉ. विकास आवळे आदि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.व्ही. पोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बहुजन समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्यासाठी महात्मा फुले आयुष्यभर झटले. न्याय आणि समानता यावर आधारलेली समाजरचना अस्तित्वात आणण्याचा ध्येयवाद त्यांनी अंगिकारला होता. केशवपन, सतीची चाल, बालविवाह अस्पृश्यता, जातीवाद यांसारख्या अनेक अनिष्ट प्रथांविरूद्ध बंड पुकारून या समस्या निवारण्याचे काम केले. म्हणून समाजाने त्यांचा 'महात्मा' म्हणून गौरविले. त्यांनी सांगितलेले सत्यशोधक विचार समाजाने आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन केले.
      
या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)