डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
सांगली – दि. ९/४/२०२५
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील संगणक शास्त्र विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. हा सोहळा विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देणारा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे सर यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याकरिता रोपास पाणी घालून करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. अमोल वंडे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेतला व त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
*प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत असताना भारती विद्यापीठ व महाविद्यालय सातत्याने विद्यार्थी विकासाकरिता कटीबद्ध असल्याचे सांगितले.भविष्य काळात निश्चितपणे आपले विद्यार्थी जगाच्या पाठीवर आपले कर्तृत्व सिद्ध करतील असा विश्वास ही व्यक्त केला.*
विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनुभव कथन करताना विविध आठवणींना उजाळा दिला. प्रोजेक्ट सादरीकरण, स्पर्धांतील सहभाग, औद्योगिक भेटी, आणि शिक्षकांबरोबरचे नातेसंबंध या सर्वांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
श्री. ए. एल. जाधव यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या समारंभात विद्यार्थ्यांना सन्मानितही करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही पोरे, श्री ए. एल. जाधव, संगणक शास्त्र विभागप्रमुख प्रा. अमोल वंडे यांच्यासह प्रा. सौ. प्रणाली पाटील, प्रा. सौ. अश्विनी पाटील, प्रा. सौ. प्राची जामदार व द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. काजल अलदार व कु. साक्षी माळी यांनी केले व कु. ताहीर मुलानी यांनी आभार मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment