yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.
      
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतातील एक महान नेते, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांचे जीवन आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. त्यांचे शिक्षण अत्यंत प्रेरणादायी होते. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारताचे पहिले संविधान तयार झाले, जे आजही समाजातील सर्व स्तरांना समानतेचे अधिकार देते.

त्यांच्या जीवनकार्यामुळे भारतीय समाजात अमूलाग्र बदल घडले. त्यांच्या शिक्षण, संघर्ष आणि नेतृत्वामुळे आजचा भारत अधिक समतावादी आणि प्रगतीशील बनला आहे. त्यांच्या जीवनातील संघर्ष, शिक्षणाची महत्ता आणि सामाजिक न्यायासाठीचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
    
यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, डॉ. विकास आवळे, डॉ. नितीन गायकवाड तसेच डॉ. रुपाली कांबळे, डॉ. वंदना सातपुते, प्रा. नरेश पवार, प्रा. मंगेश गावित, प्रा.नलेश बहिरम, आणि शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)