Header Ads

Loknyay Marathi

एनसीईआरटीने शाळा सुरू करण्यासंदर्भात सुचवली मार्गदर्शक तत्वे

एनसीईआरटीने शाळा सुरू करण्यासंदर्भात सुचवली मार्गदर्शक तत्वे



संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे सर्व राज्यातील शाळांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये एनसीईआरटीकडून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वांचा अहवाल सादर केला आहे. 

या अहवालानुसार, आता शाळा आठवड्यातून तीन दिवसच भरवणे, तसेच ही शाळा खुल्या मैदानात भरवण्यात यावी असे सुचवण्यात देण्यात आले आहे. 

तसेच एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शाळेत न बोलावता, सम विषम हजेरी क्रमांकानुसार बोलावण्यात यावे आणि शाळा दोन सत्रात चालवली जावी असे ही सांगितले आहे. या बरोबरच प्रत्येक तासामध्ये 10-10 मिनिटांचा ब्रेक घेतला जावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंद वर्गापेक्षा खुल्या मैदानात अधिक पाळले जाईल त्यामुळेे ही सुधारणा सुचवण्यात आली आहे, असे ही यामध्ये स्पष्ट केले आहे. 

अहवालात नमूद केलेली मार्गदर्शक तत्वे पुढील प्रमाणे : 

शाळा सहा टप्प्यात सुरू केल्या जातील. सुरुवातीला 11 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू केले जातील. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून 10 वी आणि 9 वी चे वर्ग, तिसऱ्या आठवड्यात सहावी ते आठवी चे वर्ग, चौथ्या आठवड्यात तिसरी ते पाचवीचे वर्ग, पाचव्या आठवड्यात पहिली व दुसरी चे वर्ग आणि त्यानंतर सिनियर के.जी चे वर्ग पालकांशी चर्चा करून सुरू करावे असे सुचवले आहे. 


याबरोबरच शाळा सुरू झाल्यावर पुढील नियमाचे पालन करावे असे सुचवण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे, एका वर्गात केवळ 30 ते 35 विद्यार्थी बोलावणे. त्या बरोबरच वर्गांच्या खिडक्या उघड्या ठेवणे, ए सी बंद ठेवणे. विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ देणे. त्यांच्या जागा न बदलणे, तसेच शक्य असल्यास त्यांच्या जागेवर त्यांचे नाव घालून ठेवणे आणि विद्यार्थ्यांना रोज त्याच जागेवर बसवावे. तसेच दर 15 दिवसांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना बरोबर विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात चर्चा करावी. तसचं वर्ग दररोज निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची असणार आहे. 

याबरोबरच आहेत शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना शाळेचे साहित्य, पाण्याची बाटली एकमेकांसोबत शेअर करण्यास परवानगी देऊ नये, तसेच शाळेबाहेर खाद्य पदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांना मास्क घालून शाळेत पाठवणे बंधनकारक केले आहे. तसेच एखादी शाळा घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत असल्यास पालक याबाबत तक्रार करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे पालक वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील तर त्यांनी शाळेला तसे कळवावे असे देखील सांगण्यात आले आहे. 

तसेच शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या पालक सभे संदर्भातील मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी करण्यात येतील. ज्या शाळेत हॉस्टेल ची सोय आहे त्यांनी देखील हॉस्टेलमध्ये याच मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा असे सुचवण्यात आले आहे