Header Ads

Loknyay Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे नव्याने जाहीर होणाऱ्या परीक्षेस बसता येणार असून कुणीही अपात्र ठरणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.

गेल्या ४ महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका वर्ग बंद आहेत. या परिस्थितीचा तसेच विविध घटकांकडून, विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचनांचा सारासार विचार करून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापुर्वीही २ वेळेस ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि काही उमेदवार कोरोनाग्रस्त असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचा सुधारित कार्यक्रम राज्य सेवा आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

११ ऑक्टोबर २०२० च्या परीक्षेत प्रवेश पत्र देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांस सुधारित दिनांकाच्या परीक्षेस बसता येईल. म्हणजेच जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ एप्रिल २०२० हाच कायम राहील.