सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे कार्य दीपस्तंभासारखे - प्राचार्य. डॉ. डी. जी. कणसे
सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे कार्य दीपस्तंभासारखे - प्राचार्य. डॉ. डी. जी. कणसे
सांगली: भारती विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती मा.डॉ.पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात एक वेगळी क्रांती घडवून आणली. सहकार आणि शिक्षण यांचा सुरेख संगम साधला. विशेषतः सहकारी साखर कारखाने, सहकारी बँक, सहकारी ग्राहक भंडारे अशा अनेक संस्था उभारल्या आणि त्या सक्षमपणे चालविल्या असे मत शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य व डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती मा.डॉ.पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले. प्रारंभी प्राचार्य डॉ. डी. जी.कणसे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा संजय ठिगळे यांनी केले. स्वागतपर भाषणात प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, मा. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन तरुणाईने वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करावी.
मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की,मा. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी शिक्षण, सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे आहे.
कार्यक्रमास विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ सौ. प्रभा पाटील, प्रा. टी. आर. सावंत, प्रा.संजय ठिगळे त्याबरोबरच महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, कनिष्ठ व व्यवसायिक शिक्षण विभागातील प्राध्यापक,शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment