समाज परिवर्तनासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची : प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे
समाज परिवर्तनासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची : प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे
स्वप्रयत्नातूनच व सातत्यपूर्ण कष्टातूनच विद्यार्थी विकास शक्य आहे व आजच्या या आव्हानात्मक युगामध्ये धेय्याधिष्टीत विद्यार्थी ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारती विद्यापीठ डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय,सांगली चे प्राचार्य डॉ.डॉ.जी.कणसे यांनी व्यक्त केले ते कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी -सांगली आयोजित ग्रेट भेट या लाईव्ह कार्यक्रमामध्ये बोलत होते.
कृष्णाकाठावरील युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन , भिलवडी - सांगली ’ या उपक्रमाचे आयोजन करित आहे.त्याच प्रवासाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाची प्रेरणा लाभावी व मार्गदर्शन घडवून आणण्याच्या उद्देशाने “ग्रेट भेट” या ऑनलाईन उपक्रमामधे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्यरत असेलेले व शिवाजी विद्यापीठ प्रथम गुणवंत प्राचार्य पुरस्कार प्राप्त मा.डॉ.डी.जी.कणसे (सर) यांची मा.विठ्ठल मोहिते सरांच्या अमोघ संवादशैलीतून प्रकट मुलाखत संवादात्मक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे आयोजित करण्यात आली होती व त्याचे पहिले पुष्प डॉ.डी.जी.कणसे सर यांच्या मुक्त संवादाद्वारे मोठ्या उत्साहात पार पडले.
डॉ.पतंगराव कदम साहेब यांचे भारती विद्यापीठ व सामाजिक क्षेत्रातील दैदिप्यमान कार्य आपल्या वाटचालीत प्रेरणादायी ठरल्याचे मत व्यक्त केले. याच सोबत ना.डॉ.विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ते देतील ती सर्व जबाबदारी अधिकाधिक ताकतीने पार पडण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आपण तयार असणे गरजेचे आहे असे सांगितले.
अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाकरिता प्राथमिक ते उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आभासी माध्यमांद्वारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक शरद जाधव यांनी केले तर कृष्णाकाठचे अध्यक्ष अमोल वंडे यांनी आभार व्यक्त केले.
Post a Comment