Header Ads

Loknyay Marathi

शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन तरुणाईने कार्यरत राहिले पाहिजे - प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे

शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेऊन तरुणाईने कार्यरत राहिले पाहिजे - प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे

आपत्तीच्या काळात न डगमगता हाती घेतलेले स्वराज्य निर्मितीचे कार्य मोठ्या  कौशल्याने करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचे आमचे आदर्श आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन तरुणाईने कार्यरत राहण्याची गरज आहे असे मत प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे यांनी व्यक्त केले.


सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  ' शिव स्वराज्य दिन' साजरा करण्यात आला.  प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 


स्वागतपर भाषणात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संजय ठिगळे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य तरूणाईला प्रेरणादायी आहे. थोरामोठ्यांच्या कार्याचा इतिहास आपल्याला बरेचकाही शिकवून जातो. मार्गदर्शनपर भाषणात डॉ. डी. जी कणसे म्हणाले की  छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य निर्मितीचे कार्य केले नाही तर रयतेच्या हिताचा कारभार केला त्यामुळे ते सर्वांना आदर्श वाटतात. रयतेचा राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहेत. याप्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभा पाटील , कला व वाणिज्य विभग प्रमुख  प्रा.तानाजी सावंत व सौ. जयश्री कणसे उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना वॉट्स ॲपच्या व टेली ग्रापच्या माध्यमातून शिवरायांच्या गड किल्ल्यांचे दर्शन घडवून आणले. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावरील रांगोळी काढली.

महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीने रांगोळीची केलेली चित्रफित

रांगोळीचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे, ग्रंथपाल प्रा. सौ. जे. डी. हाटकर, प्रा. नितीन जगताप यांनी केले.